Bhagavad Gita: Chapter 1 Verse 6-10
3 minute read
2
Chapter 1 Verse 6
युधामन्युश्च विक्रांत उत्तमौजाश्च वीर्यवान्
सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथा: ॥६॥
शब्दार्थ:
युधामन्युश्च = युधामन्यु (Yudhamanyu)
विक्रांत = पराक्रमी (Courage)
उत्तमौजाश्च = उत्तमौजा (Uttamauja)
वीर्यवान् = बलवान (Strong)
सौभद्रो = सुभद्रेचा पुत्र अभिमन्यु (Subhadra's Son)
द्रौपदेयाश्च = द्रोपदीचे पुत्र (Dhraupadi's Son)
एव = खरोकर (really)
महारथा: = सर्वक्षेष्ठ योध्दे (Best warriors)
श्लोकार्थ: येथे पराक्रमी युधामन्यु, वीर्यवान उत्तमौजा, सुभद्रेचा पुत्र अभिमन्यु व द्रौपदीचे पुत्र आहेत. हे सर्व योद्धे महारथी आहेत .
The strong Yudhamanyu and the brave Uttamaujas, the son of Subhadra (Abhimanyu,the son of Arjuna), and the sons of Draupadi, all of great heroes.
अध्याय १ श्लोक ७
Chapter 1 Verse 7
आस्मांक तु विशिष्टा ये तान्निबोध द्विजोत्तम l
नायका मम सैन्यस्य संज्ञार्थं तान्ब्रवीमि ते॥७॥
आस्मांक = आपल्या
तु = पण
विशिष्टा = विशेष
ये = जे
तान्निबोध(तान् + निबोध) = तान् म्हणजे त्यांना, निबोध = समजने
द्विजोत्तम = द्विज म्हणजे "twice born" and ब्रह्मण are twice born, so ब्राह्मणश्रेष्ठा ( द्रोणाचार्य)
नायका = नायक (Heros)
मम = माझे
सैन्यस्य = सैन्य चे
संज्ञार्थं = माहिती साठी
तान्ब्रवीमि( तान् + ब्रवीमि) =तान् म्हणजे त्यांचे, ब्रवीमि म्हणजे बोलने
ते = तुमच्या साठी
श्लोकार्थ: हे ब्रह्मणश्रेष्ठा ! आमच्या सैन्यातील सनापती पदासाठी विशेष योग्यता असणाऱ्या प्रमुख सैनानायकाची नाव तुम्हाला कळण्यासाठी मी सांगतो, ते ऐका .
Know also, O best among the twice-born, the names of those who are the most disgustinged amongst ourselves, the leaders of my army! These I name to you for your information.
अध्याय १ श्लोक ८
Chapter 1 Verse 8
भवान्भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिंजयः I
अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तिस्तथैव च॥८॥
शब्दार्थ :
भवान्भीष्मश्च( भवान् + भीष्मश्च) = भवान् म्हणजे तुम्ही( द्रोणाचार्य)(you), भीष्मश्च म्हणजे भीष्म(Bhishma)
कर्णश्च = कर्ण(karna)
समितिंजयः = युद्धात विजयी ( कृपाचार्य)(Kripacharya)
विकर्णश्च = विकर्ण(Vikarna)
सौमदत्तिस्तथैव = सोमदत्ताचा पुत्र भूरिश्रावा(Somdatta's son Bhurishrava)
श्लोकार्थ: येथे आपण स्वतः( द्रोणाचार्य), भीष्म, कर्ण, कृपाचार्य, अश्वत्थामा, विकर्ण आणि सोमदत्ताचा पुत्र भूरिश्रवा असे विजयी असणारे योद्धे आहेत .
Thyself and Bhishma, and Karna and Kripa, the victorious in war; Asvatthama, Vikarna,and Bhurishrava, the son of Somadatta.
अध्याय १ श्लोक ९
Chapter 1 Verse 9
अन्ये च बहव: शूरा: मदर्थे त्यक्तजीविताः I
नानाशस्त्रप्रहरणा: सर्वे युध्दविशारदा: ॥९॥
शब्दार्थ :
अन्ये = दुसरे (other)
च = आणि (And)
बहव: = खुप (Many)
शूरा: = शूर- वीर (brave warriors)
मदर्थे ( मद + अर्थे ) = माझ्यासाठी ( for me)
त्यक्तजीविताः( त्यक्त+जीविताः) = त्यक्त म्हणजे त्या ग करण्यासाठी ( त्याग करने को ), जीविताः म्हणजे जीवन, जीवन त्याग करण्यासाठी (जीवन त्याग करने को) (ready to sacrifice life)
नानाशस्त्रप्रहरणा: (नाना+शास्त्र+प्रहरणा:) = नाना म्हणजे अनेक (many ), शास्त्र म्हणजे शस्त्र [weapon], प्रहरणा: म्हणजे परिधान केले (Wearing )
सर्वे = सर्व ( All )
युध्दविशारदा:( युध्द+विशारदा:)= युध्द, विशारदा: म्हणजे ज्ञानी (knowledgeable)
श्लोकार्थ: माझ्यासाठी स्वतःच्या प्राणांचा त्याग करण्यास सदैव तत्पर असलेले असंख्य शुर वीर येथे आहेत. ते सर्व निरनिराळ्या प्रकारच्या शस्त्रांनी सुसज्ज आहेत आणि ते सर्वजण युद्धकलेत निष्णांत आहेत.
And also many other heroes who give up their lives for my sake, armed withvarious weapons and missiles, all well skilled in battle.
अध्याय १ श्लोक १०
Chapter 1 Verse 10
अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितम् I
पर्याप्तं त्विदमेतेषां बलं भीमाभिरक्षितम् ॥ १०॥
शब्दार्थ :
अपर्याप्तं = अपरिमित (unconquerable)
तदस्माकं = ते(that ), अस्माकं म्हणजे आमची (our)
बलं = शक्ति (Strength)
भीष्माभिरक्षितम् ( भीमा+भिरक्षितम्) = भीष्मद्वारे संरक्षित (protected by bhishma)
पर्याप्तं = मर्यादित (limited)
त्विदमेतेषां = (तु+ इदम्+ एतेषां) = तु म्हणजे परंतु (but), इदम् म्हणजे हे (this) , ऐतषां म्हणजे त्यांची(Their )
बलं = शक्ति (Strength)
भीमाभिरक्षितम् ( भीमा+भिरक्षितम्) = भीमद्वारे संरक्षित (protected by bhima)
श्लोकार्थ: पितामह भिष्म यांच्या द्वारे आपचे सैन्य सर्व बाजुंनी पूर्णपणे सुरक्षित केले असून आमची शक्तिही अपरिमीत आहे. परंतु त्यामानाने भीमाने काळजीपूर्वक रक्षण केले आहे, अशी पांडवाची सेना मर्यादित आहे .
This army of ours marshalled by Bhishma is insufficient, whereas their army,marshalled by Bhima, is sufficient